ओम नमो जी आद्या...
ओम... एक अनादी अनंत हुकार... एक अनाहत नाद... हा नाद गुंजत राहतो विश्वभरात... कधी निसर्गात... कधी संगीतात... कधी शब्दांत... शब्द... तेही असतात असंख्य... अनोख्या अक्षरांचे... त्यांच्या दुनियेत शिरायचं ते मान खाली घालून नि फक्त मन लावून अनुभवायचा त्यांचा नजारा नि निरखायचा त्यांचा नखरा... शक्य झालंच कधी चुकून तर टिपून घ्यायचं त्यांना... मग जाणवते आपल्यातच एक अनुभूती... शब्दांची... ती असतेच मुळी अवर्णनीय... मग आपल्या हातात उरतं ते फक्त ही शब्दफुलं आपल्या ओंजळीत टिपणं...
सुंदर.....व्यक्त होण्याच्या नवीन दलनातील पाहिले आश्वासक पाऊल...कीप ईट अप....!!! प्रणवाची मूर्ती सूंदर.
ReplyDelete