ले ले सेल्फी ले ले
रे...
भोवताली सुरू आहे सेल्फीयुग, एक क्लिक सही, बाकी
सब झुठ
रोजच्या रोज सेल्फी काढणं हाच एक उद्योग,
त्यासाठी स्पॉट मिळणंच एक सुयोग
अडकून स्वप्रतिमेच्या जाळ्यात, लक्ष केंद्रित
फ्रंट कॅमेऱ्यात
मान किंचित वाकडी आणि पाऊट, कधी उगाच अँक्शन नि
शाऊट
बहुतांशी स्वतःला स्वतःच टिपणं, कधी क्वचित ग्रुपसोबत
`असणं`
स्वसेल्फीच आवडे अनेकांना, इतरांचा सेल्फी फसलेला
वाटे बहुतेकांना
सेल्फीची सायकॉलॉजी, पॉझिटिव्ह-निगेटिव्हिटी, सोशल
मिडियावरची पोस्टॉलॉजी
सेल्फी काढताना दिसतं का प्रतिबिंब, की दिसतं एक
उलट... एक सुलट...
शेकडो वर्षांचा नैसर्गिक कॅमेरा, पाण्याचा खळखळता
वाहता झरा
कुरुप वेड्या पिल्लाला शहाणं करणारा, नावडतीला
आवडती ठरवणारा
त्यानंतरचा सेल्फी कॅमेरा होता आरसा, त्यानं
पत्करला सत्याचा वसा
सिंड्रेलाची आई खाष्ट, बुटक्यांची साथ बेस्ट, शेवट
गोड होणारी गोष्ट
मधल्या काळातले जत्रेतले मजेशीर आरसे, जाड-बारीक,
उंच-बुटके निरनिराळे खासे
आताच्या फ्रंट कॅमेऱ्याचे मेगा-पिक्सल, थेटच
दाखवते आहे ते पिक्चर
अनेकदा होते फोटोकारागिरी, रंग-चेहऱ्यांची
हेराफेरी
खरे-खोटे, खोटे-खरे, कृष्णधवल-रंगीत,
रंगीत-कृष्णधवल
कोलाज करी कोलाज करी, फोटोंची अवघ्या दाटीवाटी
स्वप्रतिमांचा मिळे कॅनव्हास, एकाहून एक सरस भास
लाईक्स, डिसलाईक्स, कमेंटस् शेअरिंग
मज्जा-सज्जा, उदासी-नैराश्य, बोलघेवडेपणा-वरवरचे
विचार, झटकन कॉपी-पेस्ट
होतो कुणी झपाटल्यागत, कुणी सतत अपडेट राही
कुणाला नोटिफिकेशन्सची घाई, कुणाला अनेकादा भास होई
तर कुणी झिडकारी सेल्फी, नकारे डिजिटल स्वप्रीती
स्वतःत डोकावणं, स्वतःला ओळखणं, खरंच इतकं असतं
का सोप्पं
स्वतःला जोखणं, स्वतःला जाणणं खरंच इतकं असतं का
अवघड
एकदा तरी काढा मनाची सेल्फी, मदतीला येईल बुद्धीची
स्टिक
वापरून विचारांचा कॅमेरा, संवेदनांचा टाका फ्लॅश
बघा तरी कसा फोटो येईल झक्कास, खऱ्या भावनांचा
कॅलिडोस्कोप फर्मास
अपडेट करा स्वतःला तत्त्वांनी, अॅप डाऊनलोड करा माणुसकीचं
हो गई सब तय्यारी, सेल्फी आएगा अब भारी
ओ सेल्फीबाज, ले ले सेल्फी ले ले रे...
छायाचित्रे – इंटरनेटवरून साभार.
No comments:
Post a Comment