वाह मित्रा...
ऐका मित्रांनो, तुमची कहाणी...
मित्र नंबर एक... तुझी ओळख थोडी आधीपासूनच होती...
कधी तू शाळेत किंवा पार्कात यायच्या-जायच्या
वाटेवर भेटायचास.
पाऊस यायच्या आधी तू दिसणार हे नि एवढंच माहित
असायचं...
पुढं शिक्षण, नोकरी आणि अन्य धबडग्यात तू आहे
तस्साच राहिलास...
दर मोसमांत फुललास, बहरलास नि मिटलास... पुन्हा
नव्यानं उमलण्यासाठी...
मित्र नंबर दोन... तुझी ओळख बाबाच्या सागर उद्यानातील
सिटी वॉकमधून झाली.
शप्पथ सांगते, तू भेटलास त्या फोटोतून नि `लई भारी` वाटलेलं... खरं तर
हा शब्द तेव्हा `कॉईन` झाला नव्हता... पण
फिलिंग सेम्मच होतं.
मग `ईमेल्स`च्या दिवसांच्या रिवाजाप्रमाणं मैत्रिणीला तुझा
फोटो पाठवून तुझी महिती काढली...
मग तू कधी, कसा दिसशील, याचा शोध घ्यायला सुरुवात
केली...
फारशी भेट झाली नाही पण त्यानंतर... कारणं होती
वर म्हटल्याप्रमाणं नेहमीचीच...
तू आहे तस्सास राहिलास... दर मोसमांत फुललास,
बहरलास नि मिटलास... पुन्हा नव्यानं उमलण्यासाठी...
तर दोन्ही मित्रवर्यांनो...
गेली काही वर्षं पुन्हा तुमच्या अस्तिस्वाची
जाणीव होऊ लागलेय, प्रकर्षानं...
रोजचा रस्ता असो, हायवे असो किंवा घाटमाथा असो...
तुमच्या खुणा कुठं दिसतात का ते शोधत राहाते
वेड्यासारखी...
शोधलं की सापडतंच, या न्यायानं तुम्हीही यंदा या
शोधाचं सार्थक करायचं ठरवलेलं दिसलं...
मग मित्र नंबर एक...
मित्र नंबर एक... एकदम बिनधास्त... घराजवळ,
हायवेला, यायच्या-जायच्या रस्त्यांवर, बस-ट्रेनमधून, टॅक्सीतून, लग्नाच्या
हॉलमधून, काकाच्या घरातून, भावाच्या घराजवळ असा बऱ्याच ठिकाणी कुठंकुठं दिसलाच...
मग मित्र नंबर दोन...
मित्र नंबर दोन... थोडासा लाजाळू... य़शवंत
नाट्यगृहाकडून प्लाझाकडं जाणाऱ्या रस्त्यावर, कबुतरखान्याहून पन्नास पावलांवर... सायनच्या
चौकाजवळ, सुमननगरजवळच्या बागेत, मुलुंड टोलनाक्याच्या जवळ, चर्चगेट स्टेशनजवळ, पुण्यात
कर्वे रोड, पौड रोडला... असा कुठंकुठं दिसलाच...
या मित्रांच्या भेटीचा आनंद तुमच्याशी शेअर करते
आहे...
अर्थात तो असेल `माझा
दृष्टिकोन` त्यांच्याकडं पाहाण्याचा... त्यांना
पाहाण्याचा...
त्यांचे फोटो अपलोड करत त्यांना वाह मित्रा...
जिंकलंस... अशी मनःपूर्वक दाद देण्याचा...
तुमचेही आहेत का असे कुणी मित्र... जे
निरपेक्षपणं तुम्हाला हाय-हॅलो असं ग्रीट करतात... भरभरून प्रेम करतात
तुमच्यावर...
स्वतः बहरतात नि इतरांना आनंद देतात... `निसर्गाचा कोडमंत्र` त्यांना गवसलाय...
आपल्याला तो ते देऊ पाहाताहेत...
तो समजून घ्यायला वेळ लागेल... तोवर त्यांना
किमान दाद तर देऊ या...
वाह मित्रा...जिंकलंस, तोडलंस... क्या बात हैं...
छायाचित्रे – जयंत कुंटे,
राधिका कुंटे.
Very nice my friend
ReplyDeletethank u.
ReplyDelete