ऊन... ऊन...
ऊन ऊन,
ऊन ऊन...
पिवळंधम्मक
मँगोला
लागतो
चटकमटक
ऊन ऊन,
ऊन ऊन...
सोनेरी फोड
द्राक्षं
लागतात
आंबटगोड
ऊन ऊन,
ऊन ऊन...
केशराचा घड
सगळ्यांचंच
लाडकं
लालेलाल
कलिंगड
ऊन ऊन,
ऊन ऊन...
तापट रागीट
रानमेव्याची
गोडी
अवीट
ऊन ऊन,
ऊन ऊन...
कोवळं कोवळं
केव्हाही
प्यावं-घ्यावं
ताजं
शहाळं
ऊन ऊन,
ऊन ऊन...
न्यारं नारिंगी
फस्त करा
संत्री-मोसंबी
ऊन ऊन,
ऊन ऊन...
एकदम शहाणं
समजून
घ्या
सूर्याचं
वागणं
ऊन ऊन,
ऊन ऊन...
No comments:
Post a Comment