मिशन सक्सेसफुल!
सावधान!!! सैनिक तय्यार? हथियार परख लो... एकएक कर के आगे बढना हैं...
खात्मा करना हैं शत्रू का... कोई नापरवाई नहीं चलैगी... चलो, आगे बढो... सगळ्या
सैनिकांनी सटासटा आपापल्या पोझिशन्स घेतल्या नि शत्रूवर आक्रमण सुरू झालं... `चुन चुन के बदला लेंगे`च्या चालीवर शत्रूला मारलं जात होतं. अगदी त्याचा
नामोनिशान राहता कामा नाही, अशा ऑर्डर्सच होत्या कर्नलच्या. सैनिकांच्या मनात ओळी
गुणगुणल्या जात होत्या – ``धूळ आणि कोळिष्टकांच्या शत्रूसंगे... युद्ध आमुचे
सुरू... स्वच्छता आम्ही करू...`` हे सैनिक असतात घरातले
ज्युनिअर्स नि कर्नल होते सिनिअर्स.
भाईयों और बहनों, मित्रों और सुजनों, ये कहानी
हैं घर घर के स्वच्छता अभियान की! मान्य आहे, तुम्ही
व्हिव्हिआयपीजच्या वरताण बिझी असता. तुमच्याकडं घरातली साफसफाई करायला वेळ तो
कुठून येणार? मग तुम्ही माणसं हायर करता. `क्लिन होम` वगैरे ब्रॅण्डनेम
असलेल्या कंपनीशी संपर्क साधता. ते येऊन तुमच्या घराचा सर्व्हे करतात. कसली नि
केवढी साफसफाई करायचेय, याचा अंदाज घेऊन कोटेशन देतात. पटलं नि परवडलं तर त्यांना
बोलावलं जातं नि घरातली साफसफाई परस्पर होते. दोनेक दिवस ती माणसं घरात असतात.
त्यांच्यावर देखरेख करायला आपल्यापैकी कुणाला सुट्टी घ्यावी लागते. त्यांना हवंनको
बघावं लागतं. त्यांच्या पेमेंटच्या आकड्यामुळं किमान आठवडाभर सिनिअर्सचं –
घरातल्या नि ऑफिसमधल्याही लेक्चर ऐकावं लागतं.
काहींना साफसफाईवाला किंवा साफसफाईवाली बाई पत्करेल
असं वाटतं. आधी घरातल्या कामवाल्या बाईला विचारणा करताच ती फणकारते- `मला नाही बॉ वेळ`! आपण
चेहरा पाडून म्हणतो, ``म्हणशील तेवढे पैसे देतो...`` पण ती आपल्या नकारावर ठाम असते. उलट आपल्या
साफसफाईची विचारणा ऐन सीझनमध्ये - मे महिन्यात असेल तर ती आणखीन आगाऊपणा करत
पंधरवडाभर गावाला निघून जाते. मग मुद्दलात साफसफाईच करणाऱ्यांना विचारणा होते.
त्यांचं टाईमटेबल आपल्याही वरताण बिझी असतं. तरीही प्रोफेशनली वागत हा राजू किंवा
ही राणी `फोन करून कळवतो`, असं
उत्तर तोंडावर देतात. `अमूक तारखेला नक्की येतो`, असं कळवलं जातं. आपण त्या दिवशी भराभरा आपली
कामं उरकून त्यांची वाट पाहतो. पण ``वाट पाहून जीव
शिणला... वेळामागून वेळ गेला...`` असं गाणं
पुटपुटण्याची वेळ आपल्यावर येते. ऐन वेळी हे राजू किंवा राणी काहीतरी कारणबाजी सांगत
प्रत्यक्षात कामाला येतच नाहीत. मग आपल्यालाच अक्षरशः कंबर कसून उभं राहावं लागतं.
हाती झाडू, पुणेस्टाईल स्कार्फ बांधून पॅक केलेला
चेहरा नि धुळीशी साधर्म्य सांगणारे कपडे अशा अवतारातले आपण घरचा कानाकोपरा झाडू
लागतो. सुरुवातीला सवय नसल्यानं होतंच थोडं अधिक हाश्शहुश्श... पण खरं सांगू का,
रुटिनपेक्षा हे वेगळं काम आवडू लागतं. आपल्याच घराशी आपली नव्यानं ओळख होऊ लागते.
काम करताना घर जणू आपल्याशी बोलतं... आपल्या जखमा हळूवार सांगतं... आपल्या वेदनांत
सामील करून घेतं. त्याच्यावरच्या कोळी, मुंग्यादींच्या बेकायदा आक्रमणाला आपण
हुसकावून लावतो. सगळ्या टाईल्स, भिंती घासघास घासूनपुसून एकदम झकासपैकी लखलखीत
करतो. भिंतीवरल्या फ्रेम्स, शोकेसमधल्या चीजवस्तू आणि घड्याळावरची धूळ झटकली जाते.
या वस्तूंना त्यांचं मूळरुप प्राप्त होतं. इलेक्ट्रॉनिक वस्तूंची यथायोग्य उगानिगा
नि ट्रॉलीजना केलेलं तेलपाणी, वॉशरुम्सचा मेंटेन्स, सगळ्याच पडद्यांची अदलाबदली.
सोफा कव्हर्सपासून ते नॅपकिन्सना धो डालणं नि लाकडी फर्निचर `दम लगा के हैश्शा...` म्हणत सरकवत चकाचक करण्याचा चंग बांधणं... एक `सही फिलिंग` असतं या
सगळ्यामध्ये... स्टूलावर चढून सिलिंग झाडताना तोल सांभाळावा लागतो, नाहीतर हात
गळ्यात पडायचा... कारण, सिनेमा-मालिकांप्रमाणं आपण पडताना आपल्याला कुणी धरायला
येणार, असा सीन काही ठरलेला नसतो. उलट पडल्यावर चार गोष्टी ऐकून घ्याव्या लागायची
शक्यताच अधिक!
तो लोगों, हमारा मेन एम क्या हैं की, घर की
साफसफाई अच्छी और पुरी तरह से होनी चाहिए, बस्स इतनाही! मग या
ध्येयपूर्तीसाठी कसं झटायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न नि ज्यानं त्यानं शोधावी,
ज्याची त्याची उत्तरं... आखिर में घर को क्या मंगता है की, आपका मिशन सक्सेसफुल हो! त्यासाठी फक्त झाडू घेतलेली सेल्फी कामाची नाही.
हवेय खरीखुरी स्वच्छता. तो चलो, साथी हाथ बटाना...
:D mastch
ReplyDelete:D mastch
ReplyDeletethank u.
ReplyDelete