Sunday, 5 February 2017

पिंपळ...पान...

वारा वाहातो, मना सुखावतो
कधी झुळूझुळू, कधी मुळूमुळू
पाने सळसळतात, त्याच्याशी कुजबुजतात
पिंपळाचा विस्तार, फांद्यांचा हा भार
पक्ष्यांचे गुंजन, उल्हासते मन
निवाऱ्यात बसतात, आसरा घेतात
सुखदुःखे झेलतात, वादळांना पेलतात
तो निश्चल असतो, सारं सहन करतो
पिंपळावरची भूतीण, मुळीच नसते डाकीण
महत्त्वाचा वृक्ष हा, बहरला किती पाहा
दृष्ट लागेल म्हणून, आडवाटी उभा आपणहून...
पिंपळाचा पार, मनाचा नुरला थार  
आठवणींचा पदर उलगडला,
मनी दाटते कधी शून्यता
कधी अचानक शिरले वारे
आनंदानं अवघे गा रे
कुणाच्या स्मृती मोरपंखी
शहाऱ्यांची अलगद नक्षी
रेखाटती कुणी बोचऱ्या
घडवती मनास कोऱ्या
सुखदुःखाच्या अनेक नावा
विश्रांतीची असे वानवा
असेच देखिले पिंपळपान
त्याचा उमटे ठसा गहन...




(छायाचित्र - इंटरनेटवरून साभार)

No comments:

Post a Comment