मैत्रीचा कॅलिडोस्कोप
आजच्या मैत्रीदिनानिमित्त मित्रत्वाच्या भावनांचा हा रंगीबेरंगी कॅलिडोस्कोप.
मैत्री म्हणजे
स्नेहाची
सावली
आशेची
पालवी
एनर्जीचा
आखाडा
भावनांचा
गुंताडा
मैत्री
म्हणजे
रुसवे
फुगवे
डावे
उजवे
राग
लोभ
भावनांचा
क्षोभ
मैत्री
म्हणजे
मनाची
आपुलकी
थोडीशी
वडिलकी
बरीचशी
दादागिरी
भावनांची
कारागिरी
मैत्री
म्हणजे
काही
वेळा प्रौढी
काही
वेळा स्वार्थी
काही
वेळा दुजाभाव
भावनांचे
स्वभाव
मैत्री
म्हणजे
कधी
आगाऊपणा
कधी
चुलगखोरपणा
कधी
कांगावा
भावनांचा
सांगावा
मैत्री
म्हणजे
भास
आभासाचे डोह
वास्तव
सत्याचा दाह
मनोरथांचा
भारी दंगा
भावनांचा
चाले पिंगा
मैत्री
म्हणजे
बालपणीच्या
आठवणी
तारुण्याची
गाणी
मध्यमांचे
तराणे
भावनांचे
म्हातारणे
मैत्री
म्हणजे
टोकरीतला
रानमेवा
अवीट
सुखठेवा
खट्टी-मिठी
बोली
भावनांची
बाहुली
मैत्री
म्हणजे
मैत्रीसाठी
शब्द अपुरे
मैत्रभाव
सदा पाझरे
जिवाला
जीव देणे
भावनांतले
मैत्र जाणणे
मैत्री
म्हणजे
जीवनाचा
शोध
आयुष्याचा
बोध
अविरत
मग्न
भावनांतले
स्वप्न...
छायाचित्र
– इंटरनेटवरून साभार
अप्रतिम लिहिले आहे. मित्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 😇
ReplyDeletethank u.
Deleteमैत्रीचे सुंदर काव्य
ReplyDeleteNehami pramane apratim
ReplyDeletethank u.
Delete