बाबा,
`फादर्स डे`च्या निमित्तानं, साधलेला हा संवाद... तसं
एरवीही आपण बोलतो... भांडतो... चर्चा करतो... प्रसंगी पिटुकली मारामारीदेखील... पण
अनेकदा असंही काही असतं, जे अव्यक्त राहातं... माझं झालंय,
तसं तुझंही असेल बहुधा... कसंय की आम्ही पोरं हल्लीच्या
सायकॉलॉजीच्या धरून आपापल्या फिलिंग्ज व्यक्त करतो... पण तुम्ही बाबालोकं अजूनही
थोडे कोषातच राहताय... थोडं तुम्हीही व्यक्त व्हायला शिकायला पाहिजे नाही का...
कारण आता बाबा लोकंही `टिपिकल बाबा` कँटँगरीतले राहिलेले नाहीत. पालकत्वाची जबाबदारी तू नि आई मिळून निभावत
असता...
आता कुणी म्हणेल, बापानं काय करावं, हे पोरं शिकवायला लागलीत... पण
खरं तर `आम्ही मोठं झालोय,` हे
तुम्हीच मोठी माणसं सतत आमच्या मनावर बिंबवता नि मग आम्ही काही सांगितलं तर मग
पुन्हा तोच तो राग आळवला जातो... असं सोईसोईनं खरंच लहान-मोठं होता येतं का? तसं असतं तर सगळ्यांनीच `लहान राहाणं` प्रिफर केलं असतं, ते शक्य नाहीये, हेही कळतंय... सो, असं कुणी म्हणून `मोठं नि लहान` होत नसतंच... आम्हांला तुमचं `बाबापण` आहे तसंच आवडतंय... तुम्हांला काय वाटतंय आमच्याविषयी...
जनेक्सटविषयी... ते नक्की पोस्ट करा... तेही सोशल साईटवर... कारण मग सगळ्याच
बाबांचं `ई माध्यमा`तून
व्यक्त होणं हेच खरं `फादर्स डे`चं
मोठ्ठं सेलिब्रेशन ठरेल. `हँप्पी फादर्स डे`!
सगळ्या पोरांबाळांच्या वतीनं घेतलेला हा पुढाकार...
प्रिय
बाबास...
मुलगी
झाली... अभिनंदन...
घरात
फुललं आनंदवन...
इवलीशी
कुडी हातात घेताना...
जीव
आकाशाएवढा झाला होता तुझा...
कुशीवर
वळणं... रांगणं...
माझ्या
वाढीत तुझं सामील असणं...
पहिल्यांदा `बाबा` शब्द उमटल्यावर
चेहऱ्यावर
फुललेला आनंद...
फोटोग्राफीची
मॉडेल घरातलीच
क्षण
टिपायची घाई मनातली...
माझ्या
वाढत्या मस्तीत
तुझं
सहजपणं सामील होणं...
मूलांत
मूल होऊन
त्यांच्यासोबत
धम्माल करणं...
धरून
तुझं बोट
चालायला
शिकले वाट
अक्षरं
गिरवणं नि रेघोट्या ओढणं...
केलास
काही शिकवायचा प्रयत्न...
धावपळीची
शाळा संपली
आपली
मैत्री अधिक रुळली
कॉलेजलाईफमध्ये
तूही सामावून गेलास
मैत्रिणींचा `काका` नव्हे मित्रच होऊन गेलास
पहिली
नोकरी... नवं विश्व...
तुझा
हात कायम आश्वस्त
अभावितपणं
आलेल्या वादळांना
तू
स्वतःवर झेललंस
आयुष्य तू
पेलून धरलंस
आता
कणभर थकलायस
थोडासा
वाकलायस
आता
तू धर माझं बोट
भरपूर
चालायचेय वाट
नव्यानव्या
स्वप्नांची
आशाआकांक्षांची...
- प्लीज रिप्लाय...
No comments:
Post a Comment