`कॉफीशप्पथ`... खरंच...
`तिची` नि माझी
पहिली भेट पहिली भेट कधी झाली, हे तितकंसं स्पष्टपणं नाही आठवत... `तिची` चव मला केव्हा नि कशी भावली कुणास ठाऊक... पण
आठवतंय, तो लहानपणापासून नाकाला जाणवणारा तो `तिचा` टिपिकल `कॉफीबाज` वास... `तिचं` ते आजी-आजोबांच्या कपातलं असणं...
आई-बाबांच्या कपात `तिच्या`ऐवजी चहा असणं
नि म्या बापडीच्या नशीबात-आपलं कपात दूध असणं... तेव्हाच कदाचित `ती` आवडून गेली असेल... मग क्वचित `दूध-कॉफी` किंवा `दूध-चहा` पिण्याचे दिवस उगवले तेव्हा वाटलं, वाsssव आपण
कॉफी-चहा प्यायला लागलोय, म्हणजे `मोठ्ठे झालोय...` अर्थात त्यातला `दूध` या मेन फॅक्टर
आहे, हे जाणवून घेतलंच नसेल. पुढं आजोबा गेल्यावर `काहीतरी
सोडायचं असतं`, या समजाखातर मी चहा अर्थात तेव्हाचा `दूध-चहा` सोडला. सोडलाsss
म्हणता म्हणता चहाची चाह सुटली ती कायमचीच... कारण कॉफी का साथ काफी था। मग मी न्
कॉफी एकदम घट्टमुट्ट मैत्रिणी झालो. व्हॉट अ परफेक्ट टायमिंग. आम्हांला एक फ्रेण्ड
जॉईन झाली... आज्जी... एकदम सही मैफल जमून जायची गप्पांची... कधी शाळा-कॉलेजमधल्या
दिवसभरच्या सुरस कथा, कधी फ्रीलान्सिंग करताना उडालेली धांदल नि कधी सिनिअर्सची
मिळालेली शाब्बासकी… कधी एखाद्या लेख-बातमीला बऱ्याचजणांकडून मिळालेली दाद... कधी छापून
न आलेल्या लेखाची दर्दभरी कहाणी... `कॉफीशप्पथ`... खरंच...
जॉब लागल्यावर दुपारची कॉफीमिटिंग अर्थातच मिस झाली. पुढ्यात
आली कँटिनबॉयच्या हातची कॉफी. वेगळं दूध, वेगळी पावडर, वेगळी चव असलेलं ते पेय `कॉफी` नावानं ओळखलं जायचं. कॅटिनमध्ये खायच्या
चीजवस्तूंचा खडखडाट झाल्यावर मग `कॉफी`
नि `पार्ले-जी`चाच
पोटाला आधार दिला जायचा. नंतरच्या ऑफिसमधला कँटिनबॉय त्याच्या टिपिकल साऊथइंडियन स्टाईलनं
म्हणायचा ``मॅडमsss काsssपी...`` त्याच्या हातची कॉफी असायची कधी वेलचीवाली
कधी इतकुशाच दूधाची... कित्येकदा मशीनमेड कॉफीही प्यायली. पण मशीनची कॉफी आपलीशी
नाही बॉss वाटली. ती एकदम स्थितप्रज्ञच... कधी सहकाऱ्यांसोबत
भटाकडं गेल्यावर ते आरामात कटिंग घ्यायचे, अगदी चवीचवीनं... पण भटाकडची कॉफी कधीच
नाही आवडली. मग तिथं आपण फक्त गप्पाच मारायच्या असं ठरवलं मनाशी. मुलाखतींच्या
निमित्तानं गेल्यावर पहिली विचारणा व्हायची नि अजूनही होते ती चहाचीच. तो घेतच
नाही म्हटल्यावर `मग कॉफी?` असं
(नाईलाजानं असावं कदाचित!) विचारलं जातं. ती ऑर्डर केली जाते....
आपल्या पुढ्यात कॉफीचा कप उगवतो तो मुलाखत संपल्यावर, तोही साययुक्त... मग पक्का
डिसाईड किया... नायsss नोsss नेव्हरsss... `काही घेतच नाही`, असं
समोरच्याला सांगायचं. विषयच संपला. असं खोटं बोलणं चालतं बॉsss कॉफीसाठी कायपणsss `कॉफीशप्पथ`... खरंच...
त्या अर्थानं मी `कॉफीबाज` नाहीये. की बॉsss वरचेवर कॉफी पितेच किंवा ती नाही
प्यायली म्हणून डोकं दुखतं वगैरे वगैरे. अर्थात मी अशी `कॉफीबाज` आहे की, कॉफी मिळत नाहीये, म्हणून नाईलाजानं मी चहा चालेल, असं ऑप्शन
स्वीकारलाय. नाही बॉsss अज्जिबातच नाही. खरंच कॉफीशप्पथ... कॉफी
एकदम स्ट्रॉंग लागते बॉsss आपल्याला. तिचं परफेक्ट
कॉम्बिनेशन नाही जमलं तर कॉफीला भेटण्यात काहीच मज्जा नाही राव... कारण ही
स्ट्रॉंग कॉफीच मग सुखात आपल्यासोबत हसते नि दुःखात आपल्यासोबत रडतेही... आज्जी
गेल्यावर `ती`च तर देतेय मला कंपनी...
दोघीही आज्जीला मिस करतोय... `कॉफीशप्पथ`... खरंच...
चहा नि कॉफीची तुलना होऊच शकत नाही. चहातला कोरडेपणा कॉफीत
नाहीए. कॉफीत आहे आपलेपणा... एक फ्रेण्डलीनेस... त्यामुळं कॉफीशॉप्सची टेबल्स सतत
बुक्ड नसली तरच नवल. मे बी, सिनेमातल्यासारखं असावं का, `कॉफी आणि बरंच काही`... सीझन कोणताही असला तरी
घरगुती कॉफीचं रंगरूप फारसं नाही बदलत. फारतर तिला वेलची-जायफळाची जोड... म्हणूनच
मला ती वाटत असावी तत्त्वनिष्ठ... एकदम सच्चीमुच्ची... कधी कॉफीफँन्स एकत्र भेटल्यावर
चिक्कार गप्पा रंगतात `तिच्या`सोबतच `तिच्या`वरूनच... `तिचे` ब्रँण्डस्, फ्लेव्हर्स, `तिचे` नवनवे अवतार नि `तिची` जुनी
कुंडलीही... आता झालाय `कॉफी टाईम`... शेअरिंग
टाईम... अगदी `कॉफीशप्पथ`... खरंच...
Agadi manatla lihilais😊☕
ReplyDeleteAgadi manatla lihilais😊☕
ReplyDeleteकॉफीशप्पथ... धन्यवाद.
ReplyDeleteKhup Chhan... Agadi coffee Shappath :)
ReplyDeleteकॉफीशप्पथ... धन्यवाद.
ReplyDeleteछान. वाचताना कॉफी हवी होती हातात. :)
ReplyDeleteExactly as it should b Radhika tai... vachtana coffee chi taste janavat hoti... Article mady karach sangitla ahe coffee ani barach kahi. keep it up:). (y)
ReplyDelete@मधुकर आणि @शांभवी, कॉफीशप्पथ... धन्यवाद.
ReplyDelete