पारिजातक
फोटो सौजन्य – अनिल नाईक.
पारिजातक
मी आहे पारिजातक
जणू मांगल्याचा नायक
रंग केशरी-पांढरा
नाजूक-छोट्या
आकाराचा
आवडता मी
बन्सीधरांचा
आणि अनेक देवांचा
सत्यभामेच्या घरी
वाढलो
रुक्मिणीच्या दारी
पडलो
या गोष्टीइतकाच आहे
मी जुना
मंद सुगंध
प्रफुल्लतो मनामना
टपटप टपटप पडती फुले
चटचट चटचट वेचति मोठी-मुले
माझं अस्तित्व
बारामाही
पावित्र्याची जणू
सही
फोटो - राधिका
कुंटे.
No comments:
Post a Comment