भावानुभव
रिमझिमता पाऊस,
कोसळे सरस
नभ होती रिते, अशी
भावूकता दाटे
मनामनातील चाफा, गंध
त्याचा पसरला
कुंजने आमराईत
ऐकावी, कोकिळ धून बसरावी
तोच अवचित पुढे
सरकती, थेंबावरती अनेक थेंब
हिरवीगार झाडे
झुकती, कुरुवाळीत आपुले प्रेम
लागावी मग भावसमाधी,
घ्यावा पुरेसा अवधी
आपसूक होई चिंतन,
विचारांचे चिक्कार मंथन
मोडतोड, तोडमोड होईल,
हाती काही गवसेल
नवे शब्द, शब्दांना
अर्थ
अर्थला गंध, गंधाला
श्वास
श्वासाला मन, मनाला
कोण
मन मातीचे, कोण्या
रितीचे
मातीतून आकारला
शब्द, शब्दांतून उलगडले अर्थ
अर्थाला लाभला गंध,
गंधाला हवासा श्वास
श्वासास लाभले मन,
मनाला हवेसे कोण
शब्द, अर्थ, गंध,
श्वास, मन
चाले अखंड प्रवास
सृजन
रिमझिमता पाऊस, रिमझिमता
पाऊस
कोसळे सरस... कोसळे
सरस...
छायाचित्रं - राधिका
कुंटे
No comments:
Post a Comment