मोगरा
हलली ही वेल
जसा मनीचा सल
सळसळते चैतन्य
भाव हा अनन्य
व्रत तटस्थ आचरे
जमती गोजिरी पाखरे
अवचित नवल घडे
कळी मोगऱ्याची दिसे
पाकळी पाकळी गहन
गंधागंधांचे जीवन
जिवाशिवाचा हा खेळ
घाली मांगल्याचा मेळ
उत्स्फूर्त असे देणे
शुभ्र काही
जीवघेणे...
(छायाचित्र - इंटरनेटवरून साभार.)
यावेळेस एकदम छोटा ब्लॉग ?
ReplyDeleteअसो, पण छान, मोगऱ्यासारखा !
thank u.
Delete